Sambhajinagar News | छत्रपती संभाजीनगरमध्ये मोबाईल न दिल्याने मुलाने संपवले जीवन

छत्रपती संभाजीनगरमध्ये एका सोळा वर्षांच्या मुलाने मोबाईल न मिळाल्याने आत्महत्या केली आहे. वाळूज परिसरात आई-वडिलांसोबत राहणाऱ्या या मुलाने खवड्या डोंगरावरून उडी मारून जीवन संपवले. तो पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेत होता. त्याने अनेकदा मोबाईलसाठी हट्ट केला होता, मात्र आई-वडिलांनी नकार दिला. या घटनेनंतर वाळूज पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "प्राथमिक असं समजतंय की त्याने घरी मोबाईल मागितला होता आणि मोबाईल दिला नसल्यामुळे त्याने उडी मारली असं प्राथमिक दिसून येतं अधिकची चौकशी सुरू आहे." शालेय विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलचे वेड वाढत असून, लहान मुलेही मोबाईलशिवाय जेवत नाहीत अशी स्थिती आहे. मोबाईलचे हे वेड पालकांसाठीही डोकेदुखी ठरत आहे. मुलांशी संवाद साधणे आणि त्यांची मानसिकता समजून घेणे महत्त्वाचे आहे. मोबाईलला बक्षीस म्हणून न देण्याचा सल्लाही दिला जात आहे. मुलांसमोर मोबाईलचे आकर्षण वाढू नये यासाठी पालकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola