Team India in Delhi : T20 World Cup च्या विजयानंतर टीम इंडिया भारतात, विमान दिल्लीत लँड
abp majha web team
Updated at:
04 Jul 2024 07:05 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमायदेशी आणण्यासाठी एक विशेष विमान बार्बाडोसमध्ये दाखल झालं आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) खेळाडूंच्या परतीसाठी विमान पाठवले आहे. एअर इंडियाचे बोईंग 777 बार्बाडोस विमानतळावर पोहोचले आहे. उद्या सकाळी 6 वाजता टीम इंडिया दिल्लीत दाखल होणार आहे.
टीम इंडियाने 29 जून 2024 रोजी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करुन आपले नाव कोरले. 2013 नंतर टीम इंडियाने आयसीसी ट्रॉफी जिंकली. या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण देश आपल्या टीमचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहे. मात्र टीम इंडिया अजूनही बार्बाडोसमध्ये अडकून पडली आहे. बेरिल चक्रीवादळामुळे येथील विमानतळ बंद करण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण शहरात संचारबंदी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.