Teachers Vacation | देशाच्या जनगणनेसाठी शिक्षकांच्या मे महिन्यातील सुट्ट्या रद्द | ABP Majha
देशाच्या जनगणनेसाठी मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या नेमणुका करण्यात येणार असून त्यासाठी त्यांच्या मे महिन्यातील सुट्ट्या शिक्षकांच्या रद्द करणार आहेत. पिंपरी चिंचवड इथल्या जनगणना अधिकारी यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना तसे पत्र देऊन आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील हजारो शिक्षकांमध्ये आक्रोश निर्माण झाला असून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने या निर्णयाचा निषेध केला आहे. याबाबत हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी जनगणना अधिकारी यांच्याकडे करणार आहेत.