Buldhana Khamgaon : कर भरण्यासाठी 93 हजारांची नाणी घेऊन करधारक पालिकेत
Continues below advertisement
थकीत मालमत्ता कर भरण्यासाठी तब्बल 93 हजार चिल्लर घेऊन करधारक नगरपालिकेत दाखल झाला.. बुलढाण्याच्या खामगावात ही घटना घडली. जगदीश बोहरा यांच्याकडे 93 हजार 833 रुपयांचा मालमत्ता कर बाकी होता. हाच कर भरण्यासाठी ते चक्क नाणी घेऊन नगरपालिकेत पोहोचले. अशा प्रकारच्या व्यवहारामध्ये काही नाणी घेतल्या जात नाहीत. त्यामुळे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी फक्त २० हजार रुपयांची नाणी स्वीकारली. तर, उर्वरित रक्कम टप्प्याने भरण्यास सांगितले.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Income Tax Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Buldhana Khamgaon Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv