Tata Motors Story : 'त्या' अपमानानंतर टाटांनी वाहन निर्मिती विभाग सुरू ठेवायचं ठरवलं

Continues below advertisement

Tata Motors Story : 'त्या' अपमानानंतर टाटांनी वाहन निर्मिती विभाग सुरू ठेवायचं ठरवलं 

भारतीय उद्योगजगताचे शिल्पकार आणि टाटा ग्रुपचे प्रमुख रतन टाटा (Ratan Tata) यांचे बुधवारी रात्री निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. रतन टाटा यांच्या निधनावर देशभरातील सर्वसामान्यांपासून आर्थिक विश्वातील दिग्गजांनी दु: ख व्यक्त केलं आहे. रतन टाटा यांच्या जीवनातील अनेक प्रेरणादायी गोष्टी अनेकांना माहिती आहेत. त्यापैकीच एक म्हणजे रतन टाटा यांनी फोर्ड कंपनीच्या  जॅग्वार आणि लँड रोव्हर कार निर्मितीचा विभाग खरेदी करत त्यांच्या झालेल्या अपमानाचा गोड बदला घेतला होता. 

इंडिकाच्या सुरुवातीच्या तक्रारींमुळे टाटा मोटर्सला आर्थिक फटका बसला 1999 मध्ये टाटा ग्रुप प्रवासी वाहन निर्मिती विभाग विकण्याच्या निर्णयापर्यंत आला होता. प्रवासी वाहन निर्मिती विभाग विकण्यासाठी टाटांची फोर्डच्या बिल फोर्ड यांच्याशी बैठक निश्चित करण्यात आली होती. त्या काळी फोर्डकडे जॅग्वार आणि लँड रोव्हर या कंपन्या ताफ्यात होत्या  अशात फोर्डला वाहन निर्मिती विभाग विकण्याचा निर्णय टाटा यांनी घेतला होता. 

वाहन निर्मिती विभागाच्या विक्रीसंदर्भात  बैठक सुरू असताना बिल फोर्ड यांच्याकडून रतन टाटांचा अपमान करण्यात आला होता. काहीच माहीत नसताना प्रवासी वाहन निर्मितीत हात टाकल्याबद्दल बिल फोर्डनं  सवाल उपस्थित करत रतन टाटांचा अपमान केला होता. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram