Chhabubai Chavan : तमाशा कलावंतर छबुबाई चव्हाण यांना कलागौरव पुरस्कार

Chhabubai Chavan : कोरोना संकटामुळे अडचणीत सापडलेल्या तमाशा कलावंतर छबुबाई चव्हाण यांच्यावर सध्या सफाई काम करण्याची वेळ ओढावली आहे. त्यांच्यावर ओढावलेल्या या परिस्थितीची बातमी काही दिवसांपूर्वी एबीपी माझाने दाखवली होती. या बातमीची दखल घेत त्यांना पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कलागौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. उद्या केरळच्या राज्यपालांच्या हस्ते लोणी गावात या पुरस्काराचं वितरण केलं जाणार आहे. २५ हजार रुपये रोख आणि सन्मान चिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप आहे. या पुरस्कारामुळे छबुबाई यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola