Talathi Recruitment Special Report : परीक्षा, गोंधळ, राडा; सरकारी परीक्षांचा कार्यक्रम ठरलेला?

Talathi Bharati: तलाठी भरती परीक्षेच्या सर्व्हर डाऊनच्या गोंधळानंतर पुढे होणाऱ्या परीक्षेच्या नियोजनाबद्दल सुद्धा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका आहे. परीक्षा केंद्रासाठी विद्यार्थ्यांनी दिलेले पर्याय न देता दुसरेच आणि दूरवरचे पर्याय येत असल्याने उमेदवारांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. परीक्षेसाठी फॉर्म भरताना विद्यार्थ्यांना जवळच्या सेंटरचे तीन पर्याय दिलेत मात्र तिन्ही पैकी एकही पर्याय मिळत नसल्याने परीक्षा समिती ने या सेंटर निवडीचे हे ऑप्शन तरी कशासाठी दिले असा प्रश्न विद्यार्थी विचारू लागले आहेत.  जालना जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांचे मराठवाड्याबाहेर परीक्षा केंद्र आले आहे.

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola