Talathi Exams : तलाठी भरती परिक्षेत सर्व्हरचं विघ्न, तांत्रिक बिघाडामुळे वेळापत्रक बिघडलं ABP Majha
राज्य शासनाच्या वतीनं तलाठी भरतीसाठी घेण्यात येत असलेल्या ऑनलाईन परीक्षेत आज सर्व्हर डाऊन झाल्यानं ठिकठिकाणी गोंधळ उडाला. ऐनवेळी सर्व्हर डाऊन झाल्यानं पहिल्या सत्राची परीक्षा तब्बल दीड तासानं उशिरानं सुरु करण्यात आली. त्यामुळं दुसऱ्या सत्राची ऑनलाईन परीक्षाही लांबणीवर पडली होती.