Talathi Posting : निवड होऊनही तलाठी नेमणुकीच्या प्रतीक्षेत; राज्य सरकारला विसर ?
Talathi Posting : निवड होऊनही तलाठी नेमणुकीच्या प्रतीक्षेत; राज्य सरकारला विसर ? राज्य सरकार 3 हजार 749 तलाठ्यांची निवड करून त्यांची नेमणूक करण्यास विसरलं आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय. कारण गेल्या वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये तलाठी पदासाठी स्पर्धा परीक्षा झाली.. जानेवारी महिन्यात त्याचा निकालही लागला... 4 हजार 744 यशस्वी परीक्षार्थींचे प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्र व तपशिलांची पडताळणी ही झाली... मात्र अद्याप तलाठी पदासाठी निवड झालेल्या सुमारे ३ हजार ७४९ जणांची नेमणूक सरकारकडून करण्यात आलेली नाहीय. तलाठी पद ग्रामीण भागात महत्त्वाच असून गेल्या ६ महिन्यानंतरही तलाठी पदासाठी नेमणूक का करण्यात आली नाहीय असा सवाल उपस्थित केला जातोय. नुकतच या तलाठ्यांच्या एका शिष्टमंडळांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात भेटही घेतली होती...त्यामुळे आता तलाठ्यांची नेमणूक कधी होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे..