Talathi Bharti Exam : तलाठी भरती गैरप्रकार प्रकरणी नाशिक पोलिसांकडून गणेश गुसिंगेला अटक
Continues below advertisement
तलाठी भरती गैरप्रकार प्रकरणी नाशिक पोलिसांना काल गणेश गुसिंगेला अटक केली. आणि नाशिक कोर्टाने २२ ऑगस्टपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावलीय. या प्रकरणी गणेशचे साथीदार सचिन नायमाने आणि संगीत गुसिंगे अजूनही फरार आहेत. दरम्यान, नाशिकच्या म्हसरुळ पोलिसांनी अटक केलेल्या गणेश गुसिंगेकडून एक टॅब, एक वॉकी टॉकी, दोन मोबाईल फोन आणि हेडफोन असे साहित्य जप्त करण्यात आलंय. शिवाय त्याच्या मोबाईलमध्ये परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे फोटोही आढळलेत. दरम्यान, या प्रकरणी नाशिक पोलीस कसून तपास करत असून एक पथक छत्रपती संभाजीनगरलाही रवाना झालंय. गणेश गुसिंगेचे अजून काय काय कारनामे उघड होतात? पोलिसांच्या तपासात काय माहिती समोर येते? आरोपी गणेशचे आणखी किती साथीदार आहेत? त्यांना अटक कधी होणार? हेच बघणं आता महत्वाचं ठरणार आहे.
Continues below advertisement