Tadoba Andhari Tiger Safari : आता अल्प दरात सफारी, ताडोबात दाखल होणार 6 विशेष जिप्सी

Continues below advertisement

 चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात जिप्सीचे दर खूप जास्त असल्याने अनेक पर्यटक कॅन्टरनी सफारी करतात. कॅन्टरमध्ये प्रतिव्यक्ती ५०० रुपये आकारण्यात येत असल्याने आर्थिक दृष्ट्या हे किफायतशीर आहे. मात्र, कॅन्टर हे बसच्या आकाराचे असल्याने ताडोबाच्या चिंचोळ्या मार्गावर पूर्ण जागा घेतात. सोबतच कॅन्टरचा आवाज पण जास्त असल्याने गाडीची चाहुल लागताच प्राणी पळून जातात. त्यामुळे वन्यप्राणी जवळून पाहता येत नाहीत. याची दखल घेत ताडोबा प्रशासनाने आता ९ पर्यटक बसू शकतील अशा ६ विशेष जिप्सी विकत घेतल्यात. महत्वाचे म्हणजे या जिप्सीमध्ये देखील अतिशय कमी दर आकारण्यात येणार आहे. ताडोबा कोर झोनचा पुढील सिझन म्हणजे १ ऑक्टोबर पासून सेवेत रुजू होतोय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram