Swapnil Lonkar: आत्महत्या केलेल्या स्वप्निल लोणकरची प्रशासनाकडून थट्टा? MPSC चा 'हा' संतापजनक कारभार
abp majha web team
Updated at:
15 Dec 2021 12:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमृत स्वप्निल लोणकरचं नाव एमपीएससीकडून मुलाखतीसाठीच्या उमेदवारांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही दीड वर्षांपासून मुलाखत होत नसल्याच्या नैराश्यातून स्वप्निल लोणकर या तरुणानं २९ जूनला आत्महत्या केली होती. या घटनेला ६ महिने उलटल्यानंतरही मुलाखतीसाठीच्या उमेदवारांच्या यादीत मृत स्वप्निलचं नाव देण्यात आलंय. स्वप्निलला ७ जानेवारी, २०२२ रोजी सकाळी ८ वाजता मुलाखतीसाठी बोलवण्यात आलंय. पण स्वप्निल लोणकर आता आपल्यात नाही. २९ जूनला सुसाईड नोट लिहित त्यानं आत्महत्या केली होती. त्यामुळे एमपीएससीच्या कारभारावर संताप व्यक्त केला जातोय.