Sushma Andhare on Raj Thackeray : पत्र लिहित सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंना सुनावलं

Continues below advertisement

Sushma Andhare on Raj Thackeray : पत्र लिहित सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंना सुनावलं

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीकास्र्त डागलंय. खारघरच्या दुर्घटनेवरुन ता आरोपांच्या फैरी सध्या रंगू लागल्यात. मनसे नेते संदीप देशपांडेंच्या हल्ल्याचा दाखला देत सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंना पत्रातून सुनावलंय. आपल्या पक्षातल्या देशपांडे नावाच्या एका कार्यकर्त्याला साधं खरचटलंही नव्हतं तरी सुद्धा आपण तातडीनं रुग्णालयाकडे धाव घेतली. त्यावेळी आपली ती शून्यात हरवलेली नजर माध्यमांमध्ये वारंवार दाखवली गेली होती.. एवढी धडपड खारघरमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांसाठी जरी केली असती तरी बरं झालं असतं.  अशा शब्दांत अंधारेंनी राज ठाकरेंना सुनावलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram