Sushma Andhare on Raj Thackeray : राज ठाकरे सुपाऱ्या वाजवतात, सुषमा अंधारेंचा जोरदार हल्लाबोल

ठाणे : राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जहरी टीका केली आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांचा व्हिडीओ दाखवत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. वडील चोरले म्हणता मग बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या या बाईला पक्षाचे प्रवक्ते कसं केलं, असा सवाल राज ठाकरे यांनी ठाण्याच्या सभेत केला आहे. कळव्यात रविवारी राज ठाकरे यांनी नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ भव्य सभा पार पडली, तेव्हा ते बोलत होते.

उद्धव ठाकरेंवर टीका करत राज ठाकरेंचा लावा रे तो व्हिडीओ

आज कोण-कुणावर बोलतोय, हे सगळं सोडा. जे म्हणतात माझे वडील चोरले, त्या वडीलांबद्दल एवढं प्रेम आहे, मी एकच क्लिप तुम्हाला दाखवायला आणली आहे, एकच. मी एकदाच मागच्या सभांमध्ये बोललो होतो, लावा रे तो व्हिडीओ, तेव्हा पासून सगळ्यांनी तेचं सुरु केलंय. आज मी पुन्हा बोलतोय, लावा रे तो व्हिडीओ, हे नीट ऐका, असं म्हणत त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा व्हिडीओ दाखवला. ठाण्याच्या सभेत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola