Sushma Andhare On Pune Flood : पुण्यातील पूरस्थितीचा सुषमा अंधारेंनी घेतला आढावा, नागरिकांशी संवाद
पुणे शहर (Pune Rain) परिसरात काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे विसर्ग वाढवण्यात आला. याचा परिणाम पुणे शहरातील अनेक भागात बसला आहे. त्यानंतर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यात आढावा बैठक घेतली. त्यानंतर आता खडकवासल्यातून (Khadakwasla Dam) विसर्ग वाढवण्यात येणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली होती. तर संध्याकाळी ७ वाजण्याच्या आधी धरणातून विसर्ग करण्यात येईल धरण ५० टक्के रिकामं केलं जाईल, जेणकरून रात्री पुन्हा पाऊस झाला तर धरण पुन्हा भरेल. त्यामुळे ४ वाजण्याच्या सुमारास विसर्ग वाढवण्यात येईल अशी माहिती होती. ३५ ते ४० हजार क्युसेक्सने संध्याकाळी चार ते सहा या दोन तासांच्या कालावधीत कधीही सोडण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे
पुणेकरांनी आधी जलसंपदा विभागाकडून विसर्ग वाढवण्यात येणार असल्याची माहिती दिली नसल्याचा आरोप केला होता. अशातच आता देखील ३५ ते ४० हजार क्युसेक्सने संध्याकाळी चार ते सहा या दोन तासांच्या कालावधीत कधीही सोडण्यात येईल असा मेसेज जलसंपदा विभागाच्या शाखा अभियंता गिरीजा फुटाणे यांनी दिला आहे. मात्र यामुळे पाणी नक्की कधी वाढेल याबाबत नागरिकांना नेमकी माहिती मिळत नाहिये. सध्या खडकवासला धरणातून २० हजार क्युसेक्सनेच विसर्ग करण्यात येतो आहे. तो सहा वाजेपर्यंत कधीही वाढवला जाऊ शकतो असं गिरीजा फुटाणे यांनी म्हटलं आहे.