Andhare vs Nimbalkar: 'मी माफी मागणाऱ्यांच्या परंपरेतली नाही', 50 कोटींच्या दाव्यावर Sushma Andhare ठाम
Continues below advertisement
शिवसेना (UBT) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjeetsinh Naik Nimbalkar) यांच्यावर पोलिसांवर दबाव आणल्याचा गंभीर आरोप केला आहे, ज्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. 'मी माफी मागणाऱ्यांच्या परंपरेतली नाही, मी निश्चितपणे लढेन', असे म्हणत अंधारेंनी निंबाळकरांनी पाठवलेल्या ५० कोटींच्या मानहानीच्या नोटीसला प्रत्युत्तर दिले आहे. फलटण (Phaltan) येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात (Doctor Suicide Case) अंधारेंनी निंबाळकरांवर अनेक प्रश्न उपस्थित केले. दीड वाजता पत्रकार परिषद घेतल्यानंतर अवघ्या काही तासांत निंबाळकरांना पोलिसांकडून क्लीन चिट कशी मिळाली, असा सवाल करत त्यांनी फलटण पोलीस यंत्रणा निंबाळकरांच्या तालावर नाचत असल्याचा आरोप केला. आपल्याकडे सर्व आरोपांचे पुरावे असून ते सादर केले आहेत, असेही अंधारेंनी स्पष्ट केले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement