Sushma Andhare vs Nimbalkar : मी कुणाला भीक घालत नाही, सुषमा अंधारेंचा Nimbalkar यांना थेट इशारा

Continues below advertisement
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पत्रकार परिषद घेत अंधारे यांनी निंबाळकर यांच्यावर पोलिसांवर दबाव आणून खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा दावा केला. 'आमच्यावर खासदार रणजित दादांचा खूप दबाव आहे, असं फिर्यादीकर्त्याने सांगितल्याचा उल्लेख पीडित मुलींनी सुसाइड नोटमध्ये केला आहे', असा दावा सुषमा अंधारे यांनी केला. हे पत्र 2022 सालचे असल्याचे सांगत, वर्षा आणि हर्षा आगवणे या दोन बहिणींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये निंबाळकर यांच्या नावाचा उल्लेख असल्याचं अंधारे म्हणाल्या. तसेच, महिला आयोगाच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 'सत्ताधाऱ्यांची हुजरेगिरी करणं हे जर त्यांचं परम कर्तव्य असेल तर त्यावर आम्हाला काही बोलायचं नाही', असं म्हणत अंधारेंनी महिला आयोगावर टीका केली. 'अगर मैंने कमिटमेंट कर दी तो मैं खुदकी भी नहीं सुनती', असे म्हणत ५० कोटींच्या मानहानीच्या धमकीला भीक घालत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola