Sushilkumar Shinde Special Report : ऑफरचा दावा; भेटीचा धागा ! दुसऱ्या शिंदेंना भाजपची ऑफर ?

Sushilkumar Shinde Special Report : ऑफरचा दावा; भेटीचा धागा ! दुसऱ्या शिंदेंना भाजपची  ऑफर ? लोकसभा निवडणुकीचे ढोल जोरात वाजू लागलेत... या सगळ्यात पक्षांतरं, पक्षप्रवेश, आमंत्रणं आणि निमंत्रणांचीही कुजबुज दबक्या आवाजात सुरू झालीय. मात्र, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय. ज्यामुळे राजकीय भूकंपाचे हादरे बसलेत. आपल्याला आणि आपल्या मुलीला भाजपने ऑफर दिल्याचा दावा त्यांनी केलाय. म्हणूनच, शिंदेंना खरंच भाजपची ऑफर आहे की, स्वपक्षावर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न आहे? असे सवाल आता विचारले जात आहेत

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola