Suresh Dhas speech Vidhan sabha: टूंग वाजलं की म्हातारं जातंय,पैसे काढतंय, सभागृहात धडाकेबाज भाषण

Continues below advertisement

Suresh Dhas speech Vidhan sabha: टूंग वाजलं की म्हातारं जातंय,पैसे काढतंय, सभागृहात धडाकेबाज भाषण 

हेही वाचा : 

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा दावा खोडून काढला आहे. संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) यांची हत्या आर्थिक व्यवहारातून झाली, त्यामागे जातीय कारण नव्हते, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले होते. मात्र, सुरेश धस (Suresh Dhas) यांनी हा दावा खोडून काढला. संतोष देशमुखची हत्या ही आर्थिक देवाणघेवाणीतून झाली नव्हती हे मी सांगतो, मी पण जिल्ह्यातच राहातो, असे वक्तव्य करत धस यांनी धनंजय मुंडे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. ते मंगळवारी नागपूरमध्ये विधिमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

संतोष देशमुख या तरुण सरपंचाची हत्या झाली. त्याचे फरार आरोपी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. पोलिसांनी सांगितलंय मारेकरी मोबाइल आणि गाडी बार्शीजवळ सोडून पळून गेलेत.  मारहाण करत असताना व्हीडिओ रेकॉर्ड करत दाखवला आहे. त्याला देखील 302 चा आरोपी केले पाहिजे. मारहाणीनंतर संतोष देशमुखला पाणीदेखील दिले नाही, दोन तास त्यांना मारहाण केली. मी एसआयटी नियुक्तीसंदर्भात पत्र दिले आहे. आधी सीआयडी चौकशीची नियुक्ती झाली आहे. सीआयडीला नावं ठेवत नाही, मात्र घटनेचा तपास लोकल पोलिसांकडे ठेवावा यासाठी मागणी केली. आज किंवा उद्या एसआयटी गठीत होईल, त्यानंतर ॲक्शन होईल. विमा कंपन्याबाबत काही प्रकार होतात, त्यात डाटाचा वापर करतात. यांचे कोणाला कुठे कॉल झाले, काही ट्रॅन्झॅक्शन झालेत का? संतोष देशमुख सरपंच तिसऱ्यांदा झाला होता, लवकरात लवकर आरोपींवर कारवाई व्हावी, अशी मागणी सुरेश धस यांनी केली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram