Suresh Dhas speech Beed : धनंजय मुंडेंवर हल्ला, पंकूताईंनाही खडे सवाल, सर्वात आक्रमक भाषण
Suresh Dhas speech Beed : धनंजय मुंडेंवर हल्ला, पंकूताईंनाही खडे सवाल, सर्वात आक्रमक भाषण
आमदार सुरेश यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येबाबत निषेध व्यक्त करत, क्रूर हत्या केल्याचं म्हटलं. त्यानंतर, या मोर्चात सहभागी झालेल्या राज्यातील सर्वच नेत्यांचे, जिल्ह्यातील सर्वच नेत्यांचे आमदार, खासदार यांचं नाव घेऊन भाषणाला सुरुवात केली. खून मर्डर होतात पण याची पद्धत फार चुकीची आहेत. माणसाचा खून करता, गोळ्या घाला, गाडी खाली घाला किमान जीव लवकर गेला असता. पण मारायचेच का? बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने साधी मुंगी, मोर मारला तरी गुन्हा दाखल होतो. संतोष हा तीन वेळा सरपंच होता, तीन वेळा सरपंच असलेला माणूस, जिल्हा परिषद सदस्य होण्यासारखा माणूस होता. समाजासाठी काम करणारं हे पोरगं होतं. पण, क्रूरतेनं संतोषला मारलं, त्याच्या पाठीवर जखमीवर 56 जखमा आहेत, 6 जणांनी मिळून ह्या 56 जखमा केल्या आहेत, अशी माहिती सुरेश धस (Suresh Dhas) यांनी दिली.
ज्या चुकीच्या पद्धतीने तुम्ही हत्या केली ती कोनलाच पटली नाही. तरी फेसबुकवर जाऊन असं करीन तसं करीन. धनंजय मुंडे हे बोगस मतावर निवडून आले आहेत. गोलीमार भेजेमे असं गाणं होतं, पण बीड जिल्ह्यात कुठंही गोली मार असं सुरूय, असे म्हणत आमदार सुरेश धस यांनी बीडमधील दहशत आणि बंदुकशाहीवरुन हल्लाबोल केला. ज्या ज्या अधिकाऱ्यांनी बंदुकीचे परवाने दिले आहेत, त्या सर्वांवर कारवाई करा, अशी मागणी सुरेश धस यांनी केली.