Suresh Dhas on Dhananjay Munde : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर नवा गौप्यस्फोट, पंकजाताईबाबत म्हणाले...

मुंबई : बीडमधील मकोका व खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या (Walmik Karad) अडचणी दिवसेंदिवस वाढत असून आमदार सुरेश धस यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बीडमधील सद्यस्थिती व संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासावर चर्चा केली. यावेळी, बीडमधील अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या वाल्मिक कराडशी थेट संबंध असून त्यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याची मागणी देखील धस यांनी केली आहे. दरम्यान, वाल्मिक कराडची आणखी एका ऑडिओ क्लीप आज व्हायरल झाली असून सायबर विभागाच्या महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत वाल्मिक कराडचा हा संवाद झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यावरूनही सुरेश धस (Suresh dhas) यांनी माहिती देत पुढील 15 दिवस ही क्लिप वाजणार असल्याचे त्यांनी म्हटलं. 

वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकाऱ्याच्या ह्या व्हायरल क्लिपसंदर्भात माझं मत आहे, पुढील 10-15 दिवस हे चालणार आहे. या दोन महिला अधिकारी आहेत, त्यांना आकाने फोन केलाय. किरकोळ केस सांगितली जात आहे, पण माध्यमांनी यासंदर्भात तपास करावा. मी यासंदर्भात अधिक उत्तर देणार नाही, मंत्रालयाची मीडिया म्हणजे राज्याची मीडिया आहे, तुम्ही तपास करा, असे धस यांनी माध्यमांना उद्देशून म्हटले. तसेच, त्या अधिकाऱ्याने स्पीकर ऑन कसा केला,  सोडू दे असं कसं ते म्हणाले यासंदर्भात तपास करावा. पुढील 15 दिवस हे प्रकरण चालणार आहे, ही क्लिप डीलिट करु नका, असेही सुरेश धस यांनी म्हटले. त्यामुळे, या व्हायरल क्लिपसंदर्भात आणखी गूढ वाढलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola