Suresh Dhas Meet Ajit Pawar:त्या 6-7 जणांचा आका कोण आहे? त्या आकांचा आका कोण?धस यांचा निशाणा कुणावर?

Continues below advertisement

Suresh Dhas Meet Ajit Pawar:त्या 6-7 जणांचा आका कोण आहे? त्या आकांचा आका कोण?धस यांचा निशाणा कुणावर?

हेही वाचा : 

बीड आणि परभणी प्रकरणी आज सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवेदन देणार आहेत. तत्पूर्वी बीड प्रकरणात गंभीर आरोप करणारे भाजप आमदार सुरेश धस अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. सुरेश धस यांनी ज्यांच्यावर आरोप केले तो व्यक्ती अजित पवारांच्या पक्षातील एका मंत्र्यांचा जवळचा कार्यकर्ता असल्याचे बोलले जात आहे. सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचे जवळचे कार्यकर्ते वाल्मिक कराड यांच्यावर बीड प्रकरणात गंभीर आरोप केला होता. मात्र आता बोलताना सुरेश धस म्हणाले की, मी अद्याप वाल्मिक कराड यांच नाव घेतलेलं नाही.  माझी पोलिसांना विनंती आहे की पोलिसांनी तत्काळ चौकशी करून आरोपी आणि त्यांचे आका कोण आहेत हे उघड करावे. यासाठी मी अजित पवारांची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असल्याची स्पष्टोक्ती भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली आहे.   मी अद्याप वाल्मीक कराडांचं नाव घेतलं नाही- सुरेश धस मराठवाड्यात आणि विशेषता बीड जिल्ह्यात पिक विमा योजनेत मोठा गोंधळ झाला आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी गुन्हा दाखल झाला आहे. तसेच बीड जिल्ह्यामध्ये साडेसात हजार हेक्टर सरकारी जमीन,  गायरान जमिनी, मांजरा प्रकल्पाच्या जमिनी इत्यादी सरकारच्या जमिनीवर पिक विमा भरून जवळपास सात हजार हेक्टरचा विमा उचलला आहे. धाराशिव जिल्ह्यात तीन हजार हेक्टर वरील असाच प्रकार झाला असून या प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहे. मात्र एकही आरोपी त्यात अटक नाही. हा महाघोटाळा माझ्या हाती लागला असून त्याची एक प्रत मी अजितदादांना द्यायला आलो होतो. तसेच या संदर्भातली आणखी एक प्रत मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार असून याप्रकरणी चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी करणार असल्याची माहिती भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram