
Suraj Mandhare : राज्यातील संशयित शिक्षणाधिकाऱ्यांच्या खुल्या चौकशीला सुरूवात, सुरज मांढरेंची माहिती
Continues below advertisement
राज्यातील संशयित शिक्षणाधिकाऱ्यांच्या खुल्या चौकशीला सुरूवात झाली आहे. शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे शिक्षण विभागातील कामकाज पारदर्शक करण्यासाठी आता संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्यात येणार आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू असून, या प्रणालीमुळे शिक्षण विभागातील गैरप्रकारांना चाप लागेल, असंही मांढरे म्हणाले.
Continues below advertisement