TOP 100 Headlines : Maharashtra Superfast : 12 PM : सुपरफास्ट बातम्या : 12 NOV 2025 : ABP Majha

Continues below advertisement
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील (Tuljapur Drugs Case) आरोपी आणि माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर (Santosh Parameshwar) याने भाजपमध्ये (BJP) प्रवेश केल्याने राजकीय वाद पेटला आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील (MLA Ranajagjitsinh Patil) यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेशावर खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. 'ड्रग्स तस्करीला राजाश्रय मिळतोय,' अशी गंभीर टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार (MLA Vijay Wadettiwar) यांनीही यावर हल्लाबोल करत, गुंडांच्या प्रकारानुसार भाजपने तीन वेगवेगळ्या मशीन आणल्या आहेत, असा टोला लगावला. राष्ट्रवादी काँग्रेस अखंड असताना संतोष परमेश्वर नगराध्यक्षपदी होता, या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशामुळे खळबळ उडाली असून, ड्रग्ज प्रकरणाचे खरे सूत्रधार राणा पाटील आहेत, अशी प्रतिक्रिया खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola