Supriya Sule NCP: राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणुकीसाठी खलबतं, सुप्रिया सुळेंनी दिली माहिती

Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षामध्ये बैठका सुरू असल्याची माहिती दिली आहे. निवडणुकीच्या काळात जबाबदाऱ्या कशा वाटून घ्यायच्या यावर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक पातळीवरील आघाड्या आणि जागावाटपाबाबत बोलताना त्यांनी महत्त्वपूर्ण विधान केले. 'पुढच्या दोन चार दिवसात पूर्ण स्पष्ट चित्र राज्यातलं सगळ्याच पक्षांचं तुम्हाला दिसेल,' असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यांनी हेही स्पष्ट केले की पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी यावर आधीच प्रतिक्रिया दिली आहे, त्यामुळे आपण अधिक बोलण्याची गरज नाही. या बैठकांमधून निवडणुकीची रणनीती आणि स्थानिक समीकरणांवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola