ABP News

Supriya Sule Pune : कायदा सुव्यस्था राखण्यात सरकार फेल, धारावीवरुन सुळेंचा निशाणा

Continues below advertisement

Supriya Sule Pune : कायदा सुव्यस्था राखण्यात सरकार फेल, धारावीवरुन सुळेंचा निशाणा
 मुरलीधर मोहोळ: काल चुकीची बातमी चालली. विरोधकांनी खातरजमा न करता तिचा वापर करून पुण्याची बदनामी केली.  प्रत्यक्षात खाजगी जागेत ही घटना घडली. मात्र रस्त्यावर खड्डा पडून ट्रक त्यात पडल्याच्या बातम्या चालल्या. काही लोकांनी पुण्याची बदनामी करण्याची सुपारी घेतली आहे.   देवेंद्र फडणवीस बोलतायत -  पुण्यातील नवीन एअरपोर्टचे नाव जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे नाव देण्यात येईल. तसा ठराव कॅबिनेट मिंटंगमधे मांडण्यात येईल. नितीन गडकरी आणि मुरलीधर मोहोळ याचा पाठपुरावा करतील. पंढरपूरच्या मंदीराचे रीस्टोरेशन टप्पा टप्प्यात पुर्ण होतंय. पुढच्या कार्तीकी एकादशीला हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न.  पुण्यातील वाहतूकीची समस्या सुटावी यासाठी रींग रोड तयार करण्यात येतोय. त्यासाठी जमीन अधिग्रहण वेगात सुरुय.   नितीन गडकरी बोलतायत -  मी अलिकडे राजकारण करत नाही. समाजकारण करतो. मी आत्ता निवडणूकीत उभा होतो. अनेक शिष्टमंडळे मला भेटली. पण मी सांगितलं की कोणत्याही जातीसाठी मी काम करणार नाही. समाजासाठी करेन. जो करेगा जात की बात उसको मारुंगा लाथ. काही वर्षांपूर्वी पुण्यातील आमदार - खासदारांची बैठक मी बोलावली होती. पवार साहेब देखील होते. दिड तास चर्चा यांवर चालली की मेट्रो वरुन की खालून करायची. माझा स्वभाव फारसा चांगला नाही. मी म्हटलं की तुम्ही विद्वानांचे शहर आहात. आता चर्चा बंद. मी म्हणेल तसे होईल. आणि पुण्याची मेट्रो झाली. आता एअरपोर्ट देखील असाच होईल.  पुणे - मुंबई एक्सप्रेस वे करताना माझी चुक झाली. मला तो कात्रज पासून करायचा होता. पण काही अधिकारी म्हणाले की खर्च वाढेल. अधिकारी ठराविक वय झालं की अधिकारी रिटायर्ड होतात. नवीन कपडा शिवन्याएवजी त्याला रफु करने ही त्यांची जिवन दृष्टी असते. त्यामुळे वाहतूक समस्या निर्माण झाली.  डिसेंबर महिन्यापर्यंत पुणे शहर आणि जिल्ह्यात दिड लाख कोटी रुपयांची विकासकामांचे भूमिपूजन होईल आणि कामं सुरू होतील.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram