Supriya Sule on Ajit Pawar | विधान आणि यू टर्नबाबत अजित पवारांनाच विचारा- सुप्रिया सुळे
Supriya Sule on Ajit Pawar | विधान आणि यू टर्नबाबत अजित पवारांनाच विचारा- सुप्रिया सुळे
देवाभाऊ तुमसे ये उम्मीद नहीं थी, गडकरी चांगले आहेत, त्यामुळे देवेंद्र फडणवीस चांगले असतील, असे वाटले होते. मात्र देवाभाऊ कॉपी करून पास झाले, असा टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लगावला. चांदवड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार शिरीषकुमार कोतवाल यांच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे यांची सभा झाली. या सभेतून त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बाजार समितीची मोठी इमारत आहे. मात्र, त्या मागचे अश्रु केंद्र सरकारला दिसत नाही. विदर्भात सोयाबीन आणि कापसाचे पीक आले. पण, भाव मिळत नाही. 7 ते 10 हजार क्विंटल भाव महाविकास आघाडीचे सरकार देणार आहे. मला एका माणसाचा परदेशातून फोन येतो, ताई मशीनमध्ये गडबड आहे. मी त्याला म्हटले मी मशीनमधूनच निवडून आले, पण काही मशीनमध्ये गडबड आहे, असे मी म्हणत नाही, त्या व्यक्तीचे मत आहे, असे त्यांनी म्हटले. सुप्रिया सुळेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला देवेंद्रजींना आता देवभाऊ म्हणतात, त्यांचे नाव आता बदलले. मी आलो दोन पक्ष फोडून आलो, असे ते म्हणतात. देवाभाऊ तुमसे ये उम्मीद नहीं थी, गडकरी चांगले आहेत, त्यामुळे देवेंद्र फडणवीस चांगले असतील, असे वाटले होते. मात्र देवाभाऊ कॉपी करून पास झाले, दोन पक्ष फोडून पास झाले, असा टोला सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.