Supriya Sule Mobile Hack:सुप्रिया सुळेंच्या मोबाईलसह व्हॉट्सॲप हॅक झाल्याची सुप्रिया सुळेंची माहिती

Continues below advertisement

Supriya Sule Mobile Hack:सुप्रिया सुळेंच्या मोबाईलसह व्हॉट्सॲप हॅक झाल्याची सुप्रिया सुळेंची माहिती

गेल्या काही दिवसांमध्ये नेत्यांचे फोन हॅक झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. अशातच आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा फोन हॅक झाल्याची माहिती आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) या कायमच सोशल मिडीयावर अॅक्टिव्ह असल्याचं दिसून येत. आज त्यांनी त्यांच्या सोशल मिडीयावर आपला फोन हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. 

आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास सुळे (Supriya Sule) यांनी ही पोस्ट करत कार्यकर्त्यांना व जनतेला सावध राहण्याचे आवाहन केले आहे. अत्यंत महत्वाचे आहे असे म्हणत सुळे यांनी ही पोस्ट लिहली आहे. कोणीही त्यांना फोन किंवा मेसेज करून नये असे त्यांनी आपल्या सोशल मिडीया पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सुप्रिया सुळेंनी काय लिहलं आहे सोशल मिडीयावर?

*** अत्यंत महत्वाचे ***
'माझा फोन आणि व्हॉटस्अप हॅक झाले आहे. कोणीही मला मेसेज किंवा फोन करून नये. याबाबत मी पोलीस तक्रार करत आहे. कृपया याची नोंद घ्यावी, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram