Supriya Sule on Lok Sabha Result : विजयानंतर सुळेंनी घेतली अजितदादांच्या आईंची भेट, म्हणाल्या..
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSupriya Sule on Lok Sabha Result : विजयानंतर सुप्रिया सुळेंनी घेतली अजितदादांच्या आईंची भेट
राज्यासह देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात ताई विरुद्ध वहिनी असा सामना रंगला होता. त्यामुळे, सुळे विरुद्ध पवार असा घरगुती सामना बारामती लोकसभा मतदारसंघात रंगल्याने देशाचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले होते. तर, राज्यातील हायव्होल्टेज लढत म्हणूनही इकडे पाहण्यात आले. त्यातच, राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच अप्रत्यक्षपणे ही लढत झाली. मात्र, या लढतीत बारामतीकरांनी मोठ्या साहेबांच्या बाजूने कौल दिला. त्यामुळेच, सुप्रिया सुळेंचं पुण्यात स्वागत करताना घोषणाबाजी करण्यात आली. दादांना सांगा ताई आली, वहिनींनी सांगा ताई आली, अशी घोषणाबाजी ताईसमर्थकांनी केली. दरम्यान, सुप्रिया सुळे यांना बारामतीमध्ये 1 लाख 53 हजार 960 मताधिक्याने विजय मिळाला.