Supriya Sule Called Vaibhavi Deshmukh : मला तुझा अभिमान आहे सुप्रिया सुळेंकडून वैभवी देशमुखांचे कौतुक
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार वैभवी देशमुख येथे फोनवरून अभिनंदन केले. यावर आपला सगळा आनंदच हिरावून घेतला आहे. मग पेढे कसे देऊ असे वैभवी यावेळी म्हणालीय. तू खूप संघर्ष केला आहेस म्हणून तुला मार्क भेटले आहेत,तुझा खूप सार्थ अभिमान आहे असे बोलत सुप्रिया सुळे यांनी वैभवीकडे आई व आजीच्या तब्येतीची देखील विचारपूस केली. मी तुझ्या आजीला न्याय मिळवून देते असा शब्द दिला आहे.असे सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या आहेत.
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची अपहरण करून हत्या करण्यात आली. 9 डिसेंबर 2024 रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येनंतर निष्पक्षपातीपणे तपास व्हावा यासाठी आंदोलन करत, घरात लहान भाऊ, आई, लढणारा काका यांच्यासोबत उभं राहून संतोष देशमुख यांची लेक वैभवी देशमुखने (Vaibhavi Deshmukh) बारावीला चांगला अभ्यास करत बारावीच्या परिक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. आज बारावीचा निकाल लागला वैभवीला 85.33% टक्के गुण मिळाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी संतोष देशमुखांच्या मुलीला वैभवीला कॉल केला आहे.
सगळा आनंद हिरावून घेतला ताई....
खासदार सुप्रिया सुळे यांनी मिळालेल्या यशाबद्दल वैभवी देशमुख हीच अभिनंदन केलं. यावेळी सगळा आनंद हिरावून घेतला ताई, आता काय उपयोग असं म्हणत वैभवी देशमुखने आपल्या वडिलांच्या नसण्याची खंत व्यक्त केली. सुप्रिया सुळेंना फोनवरती बोलताना वैभवीने आता फक्त न्याय मिळायला हवा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तर सुप्रिया सुळे यांनी मला तुझा खूप अभिमान आहे, असं म्हणत वैभवीचं कौतुक केलं आहे.
वैभवीला 85.33% मिळाले
आज बारावीचा निकाल लागला मला 85.33% गुण मिळाले आहेत. परंतु, माझ्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला माझे वडील नाहीत, अशा शब्दात दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने आपल्या वडिलांची आठवण जागवली. 12 वीच्या निकालानंतर वैभवीचे महाराष्ट्र भरातून कौतुक होत आहे. मात्र, आज तिचं कौतुक करायला तिचे वडील तिच्यासोबत नाहीत याचं मोठं दुःख वैभवीला आहे. वैभवीच्या डोळ्यातील अश्रू तिच्या आनंदी क्षणात अनेकांचे डोळे पाणावणारे ठरत आहेत. माझी NEET परीक्षेची देखील तयारी सुरू आहे. परंतु, काल झालेला नीटचा पेपर मला अवघड गेलेला आहे, त्याच्यात स्कोरिंग कमी येत आहे. पण, मी माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार आहे, अशी जिद्द देखील तिने बोलून दाखवली.