Supriya Sule Baramati :आपल्याला हे सरकार बदलायचं आहे, सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल

Continues below advertisement

Supriya Sule Baramati :आपल्याला हे सरकार बदलायचं आहे, सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल

हेही वाचा :

येत्या काही महिन्यांत विधानसभा निवडणुका (Vidhan Sabha Elections)  होऊ घातल्या आहेत. अद्याप विधानसभा निवडणुकांची अधिकृत घोषणा झालेली नसली, तरीदेखील सर्व पक्षांची विधानसभेसाठी लगबग सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष आपापली ताकद वाढविण्यासाठी विधानसभा निहाय मतदारसंघांमध्ये राजकीय कार्यक्रमांचं आयोजन सुरू केलंय. भिवंडी लोकसभा मतदारसंघांमध्ये (Bhiwandi Lok Sabha Constituency) येणाऱ्या भिवंडी ग्रामीण, भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम, शहापूर, मुरबाड आणि कल्याण पश्चिम या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं (Nationalist Congress Party - Sharad Pawar) तीन विधानसभा मतदारसंघांवर (Legislative Constituency) दावा केला आहे. 

भिवंडी पश्चिम, शहापूर (Shahapur) आणि मुरबाड (Murbad) या तीन विधानसभांवर आम्ही दावा करणार आहोत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे (Suresh Mhatre) उर्फ बाळ्या मामा (Balya Mama) यांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे. 

महायुतीचं वर्चस्व असल्यानंच आम्ही तिनही मतदार संघावर दावा केलाय : खासदार सुरेश म्हात्रे

खासदार सुरेश म्हात्रे यांनी दावा केलेले तीनही विधानसभा मतदारसंघ सध्या महायुतीकडे (Mahayuti) असून या तिन्ही मतदार संघामध्ये भाजप (BJP) आणि अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group) वर्चस्व आहे. भिवंडी पश्चिम मतदार संघात (Bhiwandi West Assembly Constituency) भाजपचे आमदार महेश चौघुले, मुरबाडमध्ये भाजपचे आमदार किसन कथोरे तर शहापूरमध्ये अजित पवार गटाचे आमदार दौलत दरोडा यांचे आणि महायुतीचं वर्चस्व असल्यानंच या तीनही मतदार संघावर आम्ही दावा केला असल्याचं स्पष्टीकरण खासदार सुरेळ म्हात्रे यांनी दिलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram