Supriya Sule vs Sunetra Pawar : बारमतीमध्ये नणंद भावजय यांच्यात मुकाबला? शिक्कामोर्तब कधी होणार?

Continues below advertisement

Sunetra Pawar Vs Supriya Sule : बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती हे गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात रुजलेले समीकरण आहे. पण काकांची साथ सोडून अजित पवारांनी (Ajit Pawar) भाजपची साथ धरल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्या विरोधात कोण लढणार? असा प्रश्न निर्माण झाला आणि त्यावर चर्चा रंगू लागली. खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) लढणार असल्याची राजकीय चर्चा सुरु झाली आहे. त्याला बळ सुनील तटकरे यांच्या वक्तव्यानं आणखी मिळाले आहे. त्याशिवाय गेल्या काही दिवसांपासून सुनेत्रा पवार यांच्या विकासकामाचा रथ बारमती मतदारसंघातून फिरत आहे. अजित पवार यांनीही शुक्रवारी आम्ही दिला तो खासदार निवडणून द्या, अशी भावनिक साद दिली आहे. त्यामुळे आता बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगणार, हे जवळपास निश्चित मानले जातेय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram