Navi Delhi :विधानसभेतील 12 आमदारांच्या निलंबनावरुन सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद : ABP Majha
Continues below advertisement
विधानसभेतील 12 आमदारांच्या निलंबनावरुन सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद सुरू आहे. याबाबत महाराष्ट्र सरकारने आज पुन्हा आपल्या कारवाईचे जोरदार समर्थन केले आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने ज्येष्ठ वकील सुंदरम युक्तिवाद करत आहेत. मागच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने 60 दिवसांपेक्षा अधिक काळ आमदारांचे निलंबन करता येणार नाही असे म्हटले होते. पण नियमाप्रमाणे हे 60 दिवस कॅलेंडरप्रमाणे 60 दिवस नव्हे तर अधिवेशन काळातले (सभागृहातले) 60 दिवस असतात, हे महाराष्ट्राच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले आहे. त्यामुळे आता यावर अंतिम निर्णय काय होतो ते पाहावे लागेल. मात्र, आज कदाचित निकाल राखून ठेवला जाण्याची शक्यता देखील आहे.
Continues below advertisement