SC on Motor Rules : हेल्मेटसक्ती ते LED Headlights, सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला मोठे आदेश
Continues below advertisement
सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत. 'वाढते अपघात आणि होणारे अपघाती मृत्यू हे अत्यंत चिंताजनक आहेत' असे कोर्टाने म्हटले आहे. दुचाकीचालक आणि सहप्रवाशांसाठी हेल्मेट सक्ती कठोरपणे राबवण्याचे निर्देश दिले आहेत. वाहनांवरील प्रखर LED दिवे, लाल-निळे दिवे आणि भोंगे काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. दिव्यांचा बेकायदा वापर, विक्री आणि गैरप्रकार कठोरपणे रोखण्यास सांगितले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानेही कठोर सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात. रस्ते आणि महामार्गावरील कॅमेऱ्यांद्वारे नियम न पाळणाऱ्यांना शोधण्याचे निर्देश दिले आहेत. कोल्हापुरात वाहनांना अतिरिक्त प्रखर दिवे लावण्याची फॅशन वाढली आहे, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेकजण यामुळे मृत्युमुखी पडले आहेत किंवा अपंग झाले आहेत. कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अशा वाहनांवर कारवाईचा इशारा दिला आहे. प्रखर दिव्यांमुळे अपघात होऊन दुसऱ्याचा जीव धोक्यात येऊ शकतो, असे कार्यालयाने स्पष्ट केले आहे. अधिकृत दिवे सोडून अतिरिक्त दिवे लावणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement