अनिल देशमुख यांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार CBI चौकशी होणारच
प्रशांत कदम, एबीपी माझा, दिल्ली
Updated at:
08 Apr 2021 06:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवी दिल्ली : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात दोन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या दोन्ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या आहेत. या याचिका फेटाळल्यामुळं देशमुखांना सुप्रीम कोर्टात कुठलाही दिलासा मिळालेला नाही. हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे चौकशी सुरू राहणार आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळं अनिल देशमुख प्रकरणी CBI तपास कायम राहणार आहे.