Electoral Bonds : निवडणूक रोख्यांबाबत अपूर्ण माहिती दिल्याबद्दल कोर्टानं स्टेट बँकेला फटकारलं

Continues below advertisement

Supreme Court On Electoral Bonds : निवडणूक रोख्यांबाबत अपूर्ण माहिती दिल्याबद्दल सुप्रीम कोर्टानं फटकारलं 
निवडणूक रोख्यांच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टानं स्टेट बँकेला फटकारलं आहे. निवडणूक रोख्यांचा संपूर्ण तपशील देण्याचेे आदेश आम्ही दिले होते, हा तपशील का दिला नाही, अशा शब्दांत कोर्टानं स्टेट बँकेला ठणकावलं. सोबतच, निडवणूक रोखे कुणी कुठल्या पक्षाला आणि किती रकमेचे दिले हे जाहीर करा, असे आदेशही सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. सोबतच, स्टेट बँकेला या केसमध्ये प्रतिवादी बनवत कोर्टानं नोटीस जारी केली आहे. येत्या सोमवारपर्यंत स्टेट बँकेला नोटिशीला उत्तर द्यावं लागणार आहे. तसंच, पुढची सुनावणी देखील सोमवारीच होणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram