Supreme Court On Ajit Pawar Group : पवारांचा फोटो वापरणार नाही याची लेखी हमी द्या, कोर्टानं ठणकावलं

Continues below advertisement

Supreme Court On Ajit Pawar Group : पवारांचा फोटो वापरणार नाही याची लेखी हमी द्या , कोर्टानं ठणकावलं
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह आणि नाव अजित पवार गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवारांनी सुप्रीम कोर्टात याचिका केली होती. आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. अजित पवार गट शरद पवारांचा फोटो कसा काय वापरू शकतो, ही निव्वळ फसवणूक आहे, शरद पवारांच्या लोकप्रियतेचा गैरवापर अजित पवार गट करतोय, असा युक्तिवाद शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केला आहे. त्यावर कोर्टानं अजित पवार गटाला चांगलंच ठणकावलं. शरद पवार यांचं नाव आणि फोटो कुठल्याही स्तरावर वापरणार नाही, असे लेखी स्वरुपात द्या अशी सूचना अजित पवार गटाला कोर्टानं केली. शनिवारी प्रतित्रापत्र सादर करू असं उत्तर अजित पवार गटाकडून देण्यात आलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram