SC Hearing on Maharashtra Political Crisis : पक्षातील फुटीबद्दल सरन्यायाधीशांचं महत्वाची टिप्पणी

Continues below advertisement

SC Hearing on Maharashtra Political Crisis : पक्षातील फुटीबद्दल सरन्यायाधीशांचं महत्वाची टिप्पणी

 सलग तिसऱ्या आठवड्यात कालपासून सुनाणीला सुरूवात झालीये. ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद झाल्यावर शिंदेंकडून नीरज कौल यांनी युक्तीवादाला सुरूवात केलीये. पक्षांतरबंदी कायदा आणि राज्यपालांच्या भूमिकेवरून काल ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी जोरदार युक्तिवाद केला. अभिषेक मनु सिंघवी यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर बोट ठेवलं. राज्यपालांचा बहुमत चाचणीचा आदेश चुकीचा असून दहाव्या सुचीतील अधिकारांचा गैरवापर करण्यात येत आहे, असा युक्तिवाद सिंघवी यांनी केला.. तर राज्यपालांनी त्या परिस्थितीत जे निर्णय घेतले ते त्यांचं कर्तव्य होतं असा दावा नीरज कौल यांनी केला. तसंच बोम्मई केसनुसार तो राज्यपालांचा अधिकार असल्याचा दावाही कौल यांनी केलाय. सुनावणी याच आठवड्यात पूर्ण होणार त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालय राज्यातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणी काय निकाल देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram