Ashish Shelar : ओबीसी आरक्षणासाठी पाच आठवडे स्थिती जैसे थे ठेवण्याचे कोर्टाचे निर्देश : शेलार

Ashish Shelar : ९२ नगरपरिषदांसाठी ओबीसी आरक्षण लागू होणार अथवा नाही यासंदर्भातला फैसला आता लांबणीवर पडलाय.... ओबीसी आरक्षणाचा सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल आगामी ९२ नगरपरिषदांना लागू होत नव्हता. मात्र या निकालावर राज्य सरकारनं पुनर्विलोकन याचिका दाखल केली होती.. यावर आज सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं पाच आठवडे स्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय विशेष खंडपीठ गठित करणार असल्यानं ही सुनावणी पुढे ढकलण्यात आलेय. भाजप नेते आशिष शेलार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर काय प्रतिक्रिया दिली आहे.  

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola