Manoj Jarange Support : जालन्यातील मनोज जरांगे यांच्या उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा
जालन्यातील मनोज जरांगे यांच्या उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा मिळतोय. बीडमध्येही दोन दिवसांपासून मराठा आंदोलनं सुरू आहेत तर, बीडच्या डोंगरकिनी या गावात पाच तरुण उपोषणाला बसलेत. तर दुसरीकडे अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील कोपर्डीत कालपासून सकल मराठा समाजाचं उपोषण सुरु आहे... तसेच, सोलापुरातही जरांगेंच्या आंदोलनाला मराठा बांधवांनी पाठिंबा दिलाय. तर इकडे नवी मुंबईत महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात आलंय. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याचीही मागणी केलीय. एकूणच, जालन्यातील मनोज जरांगेच्या आंदोलनाला अवघ्या महाराष्ट्रातून मराठा बांधवांचा पाठिंबा मिळतोय.
Tags :
Ahmednagar Beed Karjat Hunger Strike Maratha Movement Mumbai Mahavikas Aghadi Manoj Jarange Jalnaya Support Across The State