Sunil Tatkare : पक्षाचा आदेश पाळावाच लागणार; दादांसमोर तटकरेंचे नेत्यांना खडे बोल

Continues below advertisement

Sunil Tatkare, Mumbai : तुम्हाला 7 वर्षांचा तरी तुम्ही मुख्यमंत्री झालात, मग अजितदादांनाही 7 वर्षांचा अनुभव असताना त्यांना मुख्यमंत्रिपद का नाकारलं? असा सवाल अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना केला आहे. मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने (NCP Ajit Pawar) 25 वा वर्धापनदिन साजरा केला. यावेळी ते बोलत होते. 

आजच काही अघटीत घडल्यासारखे काही बालमंडळी सांगतात

सुनील तटकरे (Sunil Tatkare) म्हणाले, 25 वर्षांपासूनचा संघर्ष पाहातोय.  स्वाभिमानाच्या मुद्यावर लढलो. शिवाय त्या कालावधीमध्ये परकिय नागरिकाचा मुद्दाही त्या कालावधीमध्ये होता. राजकारणामध्ये अनेकदा भूमिका बदलावी लागते. परंतु घेतलेल्या भूमिकेत देखील बदल करावा लागतो. हे पक्षाच्या स्थापनेनंतर काही कालावधी लक्षात आलं. ज्या पक्षापासून फारकत घेतली, विधानसभेच्या निवडणुका स्वतंत्र लढल्या. शिवसेना, भाजपने केली नसेल तेवढी टीका त्या कालावधीमध्ये काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केली. त्यावेळी निवडणुकीचे निकाल संमिश्र लागले होते. आजच काही अघटीत घडल्यासारखे काही बालमंडळी सांगतात, अशी टीका सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी रोहित पवारांवर केली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram