Sunil Tatkare : राष्ट्रवादीची मजबुतीनं बांधणी व्हावी म्हणून Supriya Sule, Praful Patel यांची निवड
Continues below advertisement
Sunil Tatkare : राष्ट्रवादीची मजबुतीनं बांधणी व्हावी म्हणून Supriya Sule, Praful Patel यांची निवड
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यापुढे काम पाहणार आहेत. दोघांकडे देखील वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी देण्यात येणार आहे. महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा या राज्यांची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्याकडे देण्यात आली आहे. तर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड या राज्याची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्ली येथील वर्धपान कार्यक्रमात शरद पवारांनी ही घोषणा केली आहे.
Continues below advertisement