Sunil Tatkare  : सर्वांना सन्मानपूर्वक जागा दिल्या जातील असं शाहांनी स्पष्ट केलं ABP Majha

Continues below advertisement

Sunil Tatkare  : सर्वांना सन्मानपूर्वक जागा दिल्या जातील असं शाहांनी स्पष्ट केलं 
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबई विमानतळावर महायुतीची महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत नेमकं काय घडलं याचा तपशील एबीपी माझा तुमच्यापर्यंत पोहोचवतंय. जागावाटपामध्ये प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल याची खात्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री शिंद, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली. प्रत्येक घटकपक्षाला ज्या-ज्या जागांबद्दल आत्मविश्वास वाटतोय, त्याची यादी काढून लवकरात लवकर एकत्रित बैठक घ्या अशी सूचना देखील शाह यांनी केली. पुढील आठवड्यात पुन्हा एक बैठक होणार आहे, ही बैठक नवी दिल्लीत होण्याची शक्यता आहे. या बैठकीत जागावाटपावर अंतिम चर्चा होण्याची शक्यता आहे. शाह यांनी शिंदे, अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याशी मुंबई विमानतळाच्या vip लाऊंजमध्ये ४५ मिनिटं चर्चा केली. उपमुख्यमंत्री फडणवीसही या बैठकीत उपस्थित होते

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram