Sunil Tatkare on Mumbai Goa Highway : अखेर मुंबई-गोवा महामार्गाची पुन्हा डेडलाईन ठरली ABP Majha
Sunil Tatkare on Mumbai Goa Highway : अखेर मुंबई-गोवा महामार्गाची पुन्हा डेडलाईन ठरली ABP Majha
महाराष्ट्र दिनानिमित्त 'गौरवशाली महाराष्ट्र' या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचं योगदान देणाऱ्या व्यक्तींचं आणि महाराष्ट्र दिनाच्या ऐतिहासिक महत्त्वाचं दर्शन घडवण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने साकारलेल्या या उपक्रमाचं कौतुक खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. इतकंच नव्हे, तर हा उपक्रम मंत्रालयातही साकारण्याची विनंती त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे यांच्याकडे केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देत 'गौरवशाली महाराष्ट्र' हा उपक्रम आता मंत्रालयातही साकार होतोय. याच तयारीची पाहणी आज खासदार सुनील तटकरे यांनी केली.
हे ही वाचा..
अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलाच असल्याचे सांगत शरद पवारांपासून (Sharad pawar) वेगळं होऊन महायुतीसोबत जाणे पसंत केले. महायुतीसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठं यश मिळालं. तर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा मोठा पराभव झाला. शरद पवारांचे केवळ 10 आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात चर्चा केली जात आहे. मात्र, अजित पवारांनी (Ajit pawar) या चर्चेला कुठलाही आधार नसल्याचे म्हटले. तर, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय सुप्रिया सुळे घेतील, असं शरद पवारांनी म्हटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यातच, गेल्या काही दिवसांत शरद पवार आणि अजित पवार हे कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येताना पाहायला मिळत आहेत. आता, पुणे (Pune) दौऱ्यावर असताना शरद पवारांनी थेट फोन करुन अजित पवारांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा केली आहे.