Sunil Tatkare on Ajit Pawar : अजितदादांमुळे भाजपला फटका नाही, शिंदेंच्या नेतृत्वात निवडणूक लढवणार-तटकरे

Continues below advertisement

Sunil Tatkare on Ajit Pawar : अजितदादांमुळे भाजपला फटका नाही, शिंदेंच्या नेतृत्वात निवडणूक लढवणार-तटकरे

 

हे देखील वाचा

Ladki Bahin Yojana : ताई तू काळजी करु नको, तुझ्या खात्यात वर्षाला 18 हजार जमा होणार, या भावाने निर्णय घेतलाय!

मुंबई : सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri mazi ladki bahin yojana)   मोठी चर्चा सुरू आहे. या योजनेची महाराष्ट्र राज्याच्या 2024-25 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घोषणा झाली. घोषणा झाल्यानंतर अवघ्या काही तासात या योजनेचा शासन निर्णय निघाला आणि योजनेसाठी अर्ज मागवलेत. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जाणार आहेत. म्हणजेच एका वर्षात 18 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. महिलांच्या  अर्थिक  स्वातंत्र्य, आरोग्य आणि पोषणासाठी महिन्याला 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सध्या अरज मागवण्यात  आले आहे.   या योजनेसाठी एक जुलैपासून अर्ज मागवले जात असून 31 ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारीख राहणार आहे. या मुदतीत अर्ज करणाऱ्या महिलांना एक जुलैपासून या योजनेचे पैसे दिले जाणार आहेत.  या योजनेसाठी राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला पात्र ठरणार आहेत. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्या कुटुंबातील महिलांसाठी पात्र ठरणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram