Sunil Tatkare Exclusive Interview : हेलॅकॉप्टर अपघात ते जागा वाटपाचा फॉर्म्युला, तटकरेंची मुलाखत

विविध राजकीय विषयांवर अजित पवारांच्या  सुनील तटकरेंशी बातचीत केलीये आमच्या प्रतिनिधीने

पुण्यातील हेलिकॉप्टर दुर्घटनेमुळे त्रास झाला कारण ते चालवणारे कॅप्टन आणि त्यांची टेक्निकल टीम यांच्यासोबत त्याच्या आदल्या दिवशी प्रवास केला होता. तेच हेलिकॉप्टर मला सोडायला परळीला आले होते. दुर्दैवाने ती मंडळी आज माझ्या सोबत नाहीत. आम्ही निवडणुकीसाठी एका कंपनीकडून हेलिकॉप्टर घेतले होतें. आता अपघात कसा झाला याबाबत योग्य तो तपास केला जाईल 

सध्या शिवसेना 70 जागा आणि राष्ट्रवादी 40 जागा असा प्रस्ताव आहे अशी चर्चा ऐकली हा निव्वळ जोक आहे.. अमची खूप चांगली चर्चा सुरू आहे. आम्ही आता पुन्हा राज्य पातळीवर चर्चा करणार आहोत. कमी जागा अशा आहेत त्याचं प्रश्न बाकी आहे. 

जागा किती मिळणार किंवा लिस्ट कधी जाहीर करणार याबाबत येत्या 2 दिवसांत बैठक होऊन निर्णय होईल. याचं टाईम टेबल ठरेल 

हर्षवर्धन पाटील भाजप नेते आहेत. त्यांच्या वरिष्ठ पातळीवर पाटील यांना सामावून घेण्यासाठी प्रयत्न झाले होते. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून कोणीही विद्यमान आमदार जाणार नाही. अजुन 8 दिवसांनंतर तिकडून इकडं येणारं चित्रं पाहिला मिळेल. मुंबई सह महाराष्ट्रातुन अनेकजण येताना पाहिला मिळतील 

बलात्कार करणाऱ्यांची मनोवृत्ती ठेचली पाहिजे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश यांच्या समोर सुनावणी सुरू आहे. प्राथमिक सूनवण्या आत्तापर्यंत झाल्या असतील. शेवटी काय करायचं हा त्यांचा अधिकार आहे 

विधान परिषद आमदार बाबत काय कालनिर्णय आहे हा नजरे समोर ठेऊन कारवाई केली जाईल. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola