Shinde vs Thackeray : विधानसभा अध्यक्ष शिंदे गटाला झुकतं माप देतायत, सुनील प्रभूंची विधानभवनात तक्रार
अध्यक्ष पक्षपातीपणा, वेळकाढूपणा करत आहेत अशी तक्रार ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभूंनी केलीय. विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित करणारं पत्र प्रभूंनी विधानभवनाला लिहीलंय. अध्यक्ष शिंदे गटाला झुकतं माप देतायत असा आरोप या पत्रात करण्यात आलाय. साक्ष, पुरावे, प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी ठराविक वेळ दिलेली असतानाही विधानसभा अध्यक्ष शिंदे गटाला वाढीव वेळ देत कारवाई लांबवत आहेत असं या पत्रात म्हटलंय.