Sunil Maharaj : सुनील महाराजांचा ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'

Continues below advertisement

Sunil Maharaj : सुनील महाराजांचा ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Vidhansabha Election 2024) घोषणा झाल्यानंतर राज्यातील सर्व राजकीय पक्ष जोरादार कामाला लागले आहेत. महायुतीमधील भाजप आणि शिवसेना (शिंदे गटाकडून) उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून अद्याप कोणीही उमेदवारांची यादी जाही केलेली नाही. तसेच जागावाटपावरुन ठाकगे गट आणि काँग्रेसमध्ये वाद देखील झाल्याची माहिती समोर येत होती. परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सर्व काही आलबेल असल्याचं वारंवार सांगितलं. आज ठाकरे गटाची पहिली उमेदावारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र याआधीच उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा धक्का बसला आहे. 

वाशिमधील बंजारा समाजाचे पोहरदेवीचे महंत सुनील महाराज यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम केला आहे. पक्षात  वेळ आणि न्याय दिल्या जात नसल्याने  सुनील महाराज यांनी एका पत्राद्वारे हे आपलं म्हणणं मांडलं आहे. 10 महिन्यात  10 मिनिटं वेळ मिळत नसल्याची खंत व्यक्त करत सुनील महाराज यांनी राजीनामा दिला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हा सगळ्यात मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram