Sunil Vinchankar Buldhana :सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील विंचनकर विधानसभेच्या मैदानात

Continues below advertisement

Sunil Vinchankar Buldhana  :सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील विंचनकर विधानसभेच्या मैदानात

बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात चर्चिला जाणारा मतदारसंघ म्हणजे मलकापूर विधानसभा मतदारसंघ (Malkapur Assembly Constituency) या मतदारसंघात अद्यापही भाजप किंवा काँग्रेसकडून कुणालाही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नसताना आता मात्र बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले आणि बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी म्हणून जिल्ह्यात परिचित असलेले सुनील विंचनकर (Sunil Vinchankar) यांच्या एंट्रीने मलकापूर मतदारसंघात आता चुरस वाढली आहे.

सुनील विंचनकर हे मलकापूर येथे उपविभागीय अधिकारी म्हणूनही राहिलेले आहेत. नुकतेच ते अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत. उद्या म्हणजेच  दिनांक 24 रोजी ते मलकापूर विधानसभा मतदारसंघात निष्पक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस समोर सेवा निवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील विंचनकर यांचं आव्हान असल्याचे बोलले जात आहे. 

जनतेने लढाई हातात घेतलीय, त्यामुळे विजय निश्चित- सुनील विंचनकर

अनेक वर्ष शासकीय सेवेत राहून जनतेची सेवा केली. मात्र ती सेवा करत असताना निर्बंध असायचे.  म्हणून आता राजकारणात येऊन जनतेची पूर्ण वेळ सेवा करण्याचा मनोदय केला आहे आणि त्यामुळे मी मलकापूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. शासकीय सेवेत नोकरी करत असताना माझी प्रतिमा स्वच्छ प्रतिमेचा आणि काम करणारा अधिकारी म्हणून आहे. त्यामुळे जनता मला मदत करत आहे आणि ही जनतेने लढाई हातात घेतलेली असल्याचे सेवा निवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील विंचनकर म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram