Sunetra Pawar Baramati : न्याय मिळेल म्हणून लोकं हक्काने माझ्याकडे येतात - सुनेत्रा पवार

Continues below advertisement

Sunetra Pawar Baramati : न्याय मिळेल म्हणून लोकं हक्काने माझ्याकडे येतात - सुनेत्रा पवार खासदार पदी वर्णी लागल्यानंतर सुनेत्रा पवार पहिल्यांदाच बारामती मध्ये आलेल्या आहेत. सुनेत्रा पवारांचे सहयोग सोसायटी या निवासस्थानी नागरिकांची मोठी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते. सुनेत्रा पवार शुभेच्छांचा स्वीकार करत आहेत. या विषयी सुनेत्रा पवारांशी बातचीत केली आमचा प्रतिनिधी जयदीप भगत यांनी 

हेही वाचा : 

 राष्ट्रवादीच्या (NCP)  कोट्यात कॅबिनेट मंत्री पद आलं तर ते मलाच मिळणार, योग्य वेळ आल्यावर योग्य निर्णय होईल.  सुनेत्रा पवारांच्या (Sunetra Pawar)  नावाची चर्चा सुरू असताना अजित पवार  गटाचे (Ajit Pawar) नेते  प्रफुल पटेल (Praful Patel)  यांनी मोठं वक्तव्य केले आहे. छगन भुजबळांसह 13 इच्छुकांना बाजूला ठेवत अजित पवारांनी राज्यसभेच्या खासदारकीची माळ पत्नी सुनेत्रा यांच्या गळ्यात घातली.  बिनविरोध निवड निश्चित झाल्यावर रॅलीही निघाली. काहींनी दबकत नाराजी व्यक्त केली तर काहींनी मनातच नाराजीचा गळा घोटला. आता हा विषय संपला असं म्हणत नेत्यांसह कार्यकर्तेही दुसऱ्या कामाला लागले. मात्र हा  विषय संपला नाही तर खरा  आता सुरू झालाय..

अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून  मोदींच्या कॅबिनेटमध्ये मंत्री कोण होणार? पत्नीला मागच्या दारानं संसदेत एन्ट्री मिळवून दिल्यानंतर, अजित पवार मंत्रिपद घरातच ठेवणार की निष्ठावान नेत्याला देणार? आता हे प्रश्न उपस्थित करण्यामागचं कारणही तसंच आहे.मंत्री बनण्यासाठी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा या उत्सुक आहेत. तर दुसरीकडे, मीच मंत्री होणार असा प्रफुल्ल पटेल यांना पूर्ण विश्वास  आहे. तर केंद्रात मंत्रिपद मिळालं तर काम करायलं आवडेल, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या. थोडक्याच  अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram